

Gautam Gambhir Comment On MS Dhoni's Post | India vs New Zealand | T20 World Cup 2026
Sakal
टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला अंतिम सामन्यात पराभूत करत विजेतेपद मिळवले. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडला. या सामन्यासाठी स्टेडियमवर भारताचे वर्ल्ड कप विजेते कर्णधार एमएस धोनी, रोहित शर्मा आणि कपिल देव हे तिघेही उपस्थित होते. या दिग्गजांच्या उपस्थितीत भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकला.
इतकेच नाही, तर यामुळे भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) नावावर खास विक्रमही झाला. तो खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून टी२० वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकणारा पहिलाच भारतीय ठरला. २००७ मध्ये तो एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात टी२० वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग होता.