
Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघाला गेल्या काही महिन्यात संघर्ष करावा लागला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात ३-० अशा फरकाने पराभूत झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारतीय संघ कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने पराभूत झाला.
परिणामी भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याचं सलग तिसऱ्यांदा तिकीटंही मिळवता आले नाही. यानंतर भारतीय संघाच्या कामगिरीवर प्रचंड टीका झाली.