IND vs NZ, 4th T20I: श्रेयस अय्यरचा विश्वविक्रम, तर भुवीची जागा घेणाऱ्या मयंक यादवचे न्यूझीलंडला ५ ओव्हरमध्येच मोठे धक्के

Shreyas Iyer Sets World Record: भारत आणि न्यूझीलंड संघात चौथा टी२० सामना ऑकलंडला होत असून या सामन्यात भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नावावर विश्वविक्रम झाला आहे. तसेच या सामन्यात सुरुवातीलाच मयंक यादवने मोठे धक्के न्यूझीलंडला दिले.
Mayank Yadav | India vs New Zealand T20I

Mayank Yadav | India vs New Zealand T20I

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 4th T20I : भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात टी२० मालिकेतील चौथा सामना ऑकलंडला शुक्रवारी (३० ऑक्टोबर) खेळवला जात आहे. भारताने पहिले तिन्ही सामने जिंकून आधीच मालिका खिशात घातली असल्याने आता या मालिकेत पूर्ण वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न भारताचा असणार आहे.

दरम्यान, चौथ्या सामन्यात भारताला मयंक यादवने (Mayank Yadav) सुरुवातही दमदार करून दिली असून पॉवरप्लेमध्येच त्याने दोन मोठे धक्के यजमान न्यूझीलंडला दिले आहेत.

Mayank Yadav | India vs New Zealand T20I
IND vs NZ: भारताविरुद्ध आधी मालिका गमावली अन् आता न्यूझीलंडचे दोन प्रमुख गोलंदाज शेवटच्या T20I सामन्यांमधून बाहेर, कारण काय?
Loading content, please wait...