
Grand slam of cricket Saudi Arabia: ६०-६० षटकाचं क्रिकेट कमी होऊन ५०-५० षटकांवर आलं.. आता ट्वेंटी-२०चा जमाना आहे आणि त्यातही १०-१० षटकांची, १००-१०० चेंडूंच्या लीग खेळवल्या जात आहे. क्रिकेट हा मनोरंजनाचा खेळ झाला आहे. त्यामुळे कमी कालावधीत जास्त इंटटेन्मेंट करण्याचा क्रिकेट खेळणाऱ्या देशांचा प्रयत्न आहे. या सर्व लीगमध्ये कसोटी व वन डे क्रिकेटचा दम गुदमरतोय हे तितकेच खरे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC) एका बाजूला पारंपरिक क्रिकेट वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगतेय, तेच दुसरीकडे ट्वेंटी-२० लीगला मान्यता देऊन त्यांच्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा भरवतेय. आता या सर्कशीत आणखी एक लीग येऊ पाहत आहे आणि ही लीग टेनिसच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेप्रमाणे वर्षातून चारवेळा, चार वेगवेगळ्या देशांत खेळवण्याचा प्लॅन तयार केला जातोय. या नव्या लीगमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या लोकप्रियतेला धोका पोहोचेल का? एवढी मोठी गुंतवणूक नेमकं कोण करतंय? आणि यामागचा मास्टरमाईंड कोण? हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे.