भारतीय संघात स्थान मिळत नसल्यामुळे आणि ते मिळवण्यासाठी अनेक खेळाडू कौंटी क्रिकेट खेळण्याचा मार्ग अवलंबवताना दिसत आहेत. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर यांच्यासह अनेक भारतीय खेळाडू इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटमध्ये फॉर्म मिळवून टीम इंडियात पुनरागमनासाठी प्रयत्न करत आहेत. युझवेंद्रच चहलनेही काही दिवसांपूर्वी असाच निर्णय घेतला आणि आता त्याच्यापाठोपाठ ३१ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज केएस भरत ( KS Bharat) हाही लंडनला चालला आहे. इंग्लंडमधील डलविच ( Dulwich) या क्लबसोबत त्याने करार केला आहे आणि तो Surrey Championship मध्ये खेळणार आहे.