

Vaibhav Suryavanshi, Yashasvi Jaiswal Break Sehwag-Gambhir Record
esakal
Gujarat Titans vs Rajasthan Royals Marathi Update : वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Suryavanshi) पुन्हा एक वादळी खेळी करून विक्रमाला गवसणी घातली. राजस्थान रॉयल्सच्या सलामीवीराने यशस्वी जैस्वालसोबत मिळून मोठा पराक्रम केला. या दोघांनी वीरेंद्र सेहवाग- गौतम गंभीर यांचा विक्रम मोडला. आयपीएल इतिहासात असा पराक्रम करणारी ही पहिलीच जोडी ठरली. शिवाय वैभवने आणखी एका विक्रमात रिषभ पंत व इशान किशन यांनाही मागे सोडले.