

Harbhajan Singh Praises Vaibhav Sooryavanshi
Sakal
Harbhajan Singh on Vaibhav Sooryavanshi: भारताचा टी२० संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.या मालिकेत १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीला खेळण्याची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
वैभवने याच महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये भारतासाठी पदार्पण केले आहे. तो भारतासाठी पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडूही ठरला होता.
मात्र त्याला इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या तीन टी२० सामन्यांमध्ये १४, १३, १५ अशाच धावा करता आल्या. पण असे असले तरी त्याच्यावर झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी विश्वास दाखवला जाण्याची शक्यता आहे. त्याला कर्णधार श्रेयस अय्यरनेही पाठिंबा दिला आहे. दरम्यान, वैभवचे भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगनेही भरभरून कौतुक केले आहे.