Hardik Pandya absent as Mumbai Indians squad departs for Raipur
esakal
Why Hardik Pandya not travelling with Mumbai Indians? मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील पुढच्या सामन्यालाही मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिकला लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात खेळता आले नव्हते आणि तो आता रायपूरला रवाना झालेल्या मुंबई इंडियन्सच्या सदस्यांसोबत तो दिसला नाही. मुंबई इंडियन्सला १० मे रोजी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध रायपूर येथे सामना खेळायला आहे. हार्दिकच्या गैरहजेरीत सूर्यकुमार यादवने MI चे नेतृत्व केले होते आणि RCB विरुद्धपण तोच नेतृत्व करताना दिसू शकतो.