
वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात शनिवारी (१५ मार्च) होणार आहे. मुंबई इंडियन्सने गुरुवारी (१३ मार्च) एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्सचा पराभव केला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला.
मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना झाला होता. या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स पुरुष संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या तिलक वर्मा आणि कायरन पोलार्डसह मैदानात उपस्थित होता.