
Indian Premier League: इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा (IPL 2025) २२ मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन झाले होते. त्यामुळे आता प्रत्येक संघात मोठे बदल झाल्याचे दिसून आले आहेत. पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सही या हंगामातून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. आयपीएल २०२४ मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत खराब ठरले होते. त्यांना १४ पैकी फक्त ४ सामनेच जिंकता आले होते.
त्यातच मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याकडे गेल्यावर्षी नेतृत्वाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे संघावर आणि हार्दिकवर बरीच टीका झाली होती.