

Hardik Pandya Injury Update
Sakal
India vs Afghanistan ODI Series: भारतीय संघाला १३ जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. या वनडे मालिकेतील पहिला सामना धरमशाला येथे होणार आहे. पण या मालिकेपूर्वी रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांची उपलब्धता त्यांच्या फिटनेसवर अवलंबून होती.
मात्र त्यासाठी त्यांना बीसीसीआयच्या बंगळूरमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (BCCI's CoE) उपस्थित राहून फिटनेस टेस्टही द्यावी लागणार होती. नियमानुसार दोघांनीही फिटनेस टेस्ट पास केली होती. त्यामुळे बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमकडून मंगळवारी तंदुरुस्तीची प्रमाणपत्रे देण्यात आली होती. त्यामुळे दोघेही अफगाणिस्तानविरुद्ध खेळतील, अशी अपेक्षा होती.
मात्र अचानक हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) या मालिकेतून माघार घेतली, यामागील नेमक्या घटना काय घडल्या हे आता समोर आले आहे.