IPL 2027 Trade: ... तर हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्स संघात असता, पण दोन खेळाडूंमुळे फिस्कटली डील

Why Rajasthan Royals called off trade negotiations for Hardik Pandya: मुंबई इंडियन्सने काही दिवसांपूर्वीच हार्दिक पांड्याला पंजाब किंग्सला ट्रेड केले आहे. पण यापूर्वी त्यांची चर्चा राजस्थान रॉयल्ससोबतही झाली होती. मात्र मुंबई इंडियन्सने मागणी केलेल्या दोन खेळांडूंना देण्यास राजस्थानने नकार दिला.
Hardik Pandya | IPL

Hardik Pandya | IPL

Sakal

Updated on: 

Rajasthan Royals called off trade negotiations for Hardik Pandya with Mumbai Indians: भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या इंडियन प्रीमियर लीगमधील ट्रेडची बरीच चर्चा झाली. २०२४ आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेडमधून पुन्हा संघात घेतल्यानंतर कर्णधार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याच्या नेतृत्वात मुंबईची कामगिरी चढउतारांची राहिली.

याशिवाय या निर्णयाला चाहत्यांकडूनही मोठा विरोध झाला. यातच २०२६ आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स ९ व्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे मुंबई आयपीएल २०२७ पूर्वी हार्दिक पांड्याचे ट्रेड करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती आणि काही दिवसांपूर्वी ही चर्चा खरीही ठरली.

Hardik Pandya | IPL
IPL 2027: ६६ जागा, १२२० जणं शर्यतीत; KKR, LSG, SRH कडे पैसाच पैसा, स्टार खेळाडूंसाठी चुरस; जाणून घ्या Strategy
Loading content, please wait...