

Mumbai Indians Hardik Pandya Trade Updates
Sakal
Mumbai Indians Hardik Pandya Trade Updates: मुंबई इंडियन्स आयपीएल २०२७ (IPL 2027) स्पर्धेपूर्वी बरेच बदल करताना दिसत आहेत. सपोर्ट स्टाफमध्ये मोठे बदल केले आहेत. आता कर्णधार हार्दिक पांड्याचेही ट्रेडिंग ही डील जवळपास पक्की झाल्याची माहिती समोर येत आहे.
हार्दिक पांड्या गेल्या तीन हंगामांपासून मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत होता. मात्र संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. केवळ २०२५ मध्ये संघाने प्लेऑफ गाठली, पण विजेतेपदापर्यंत पोहचला आले नाही.