Hardik Pandya’s Catch Secures Impact Player Medal in India vs Oman
esakal
भारताने ओमानवर २१ धावांनी विजय मिळवला आणि आशिया चषक २०२५ मधील अपराजित मालिका कायम ठेवली.
संजू सॅमसनने ४५ चेंडूंत ५६ धावांची खेळी करत प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला.
अभिषेक शर्माने आक्रमक १५ चेंडूंत ३१ धावा ठोकल्या, अक्षर पटेल व तिलक वर्मानेही महत्त्वपूर्ण खेळ केला.
Hardik Pandya’s Catch Secures Impact Player Medal in India vs Oman : भारत आणि श्रीलंका हे दोनच संघ आशिया चषक २०२५ स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिले आहेत. शुक्रवारी भारतीय संघाने शेवटच्या साखळी सामन्यात ओमानचा पराभव केला. या सामन्यात ओमानने कडवी टक्कर दिली आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने त्यांचे सामन्यानंतर कौतुकही केले. संजू सॅमसनचे संयमी अर्धशतक, अभिषेक शर्माच्या आक्रमक धावा अन् हार्दिक पांड्याचा अफलातून झेल... हे या सामन्यातील हायलाईट्स ठरले. आता भारत उद्या म्हणजेच पाकिस्तानचा सामना करणार आहे.