
आशिया कप २०२५ मध्ये भारत–पाकिस्तानचा सामना १४ सप्टेंबर रोजी युएईत होणार.
हॅरिस रौफने दावा केला की पाकिस्तान भारताला गट फेरी व सुपर-४ दोन्ही सामन्यांत पराभूत करेल.
भारताचा संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ताकदवान दिसतोय.
India vs Pakistan Asia Cup 2025 : आशिया चषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबरला सामना युएईत रंगणार आहे. या सामन्यावरून राजकारण पेटले असताना पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफला दिवसा स्वप्न पडू लागले आहेत. त्याने भारतीय संघाला साखळी फेरीत आणि नंतर सुपर ४ मध्ये पराभूत करू असा दावा केला आहे. भारत-पाकिस्तान यांना अ गटात स्थान दिले गेले आहे आणि ९ सप्टेंबरपासून आशिया चषक स्पर्धा होणार आहे. त्यापूर्वी हॅरिस रौफच्या दाव्याने भारतीय चाहत्यांचे मनोरंजन नक्की होणार आहे.