

Harmanpreet Kaur - Smriti Mandhana Viral Video
Sakal
Did Smriti Mandhana Avoid Handshake with Harmanpreet Kaur? भारतीय महिला संघाने नुकतेच बुधवारी (२८ ऑक्टोबर) झिम्बाब्वे महिला संघाला तिसऱ्या वनडे सामन्यात पराभूत केलं आणि वनडे मालिका ३-० ने जिंकली. स्मृती मानधना पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर हा भारताचा पहिलाच वनडे मालिका विजय ठरला आहे.
दरम्यान, भारताने झिम्बाब्वेला व्हाईटवॉश दिला असला तरी, तिसऱ्या सामन्यानंतर घडलेल्या एका घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. या घटनेनंतर स्मृती मानधना आणि माजी कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यात सर्वकाही आलबेल आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.