

Harmanpreet Kaur on India Women won Asia Cup 2026
Sakal
India Won Women's Asia Cup 2026: भारतीय महिला संघाने रविवारी (१३ सप्टेंबर) आठव्यांदा आशिया कपवर नाव कोरले. दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला ७२ धावांनी पराभूत केले आणि महिला आशिया कप २०२६ स्पर्धा जिंकली. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नावावरही मोठा विक्रम झाला.
तिच्या नेतृत्वात भारतीय संघाने चौथ्यांदा आशिया कप जिंकला. त्यामुळे ती कर्णधार म्हणून सर्वाधिकवेळा आशिया कप जिंकणारी खेळाडू ठरली. तिने मिताली राजचा विक्रम मोडला. मितालीने कर्णधार म्हणून तीनवेळा आशिया कप जिंकला होता.