

Harshit Rana
Sakal
बीसीसीआयचा प्रतिष्ठीत वार्षिक पुरस्कार २०२४-२५ सोहळा (BCCI Awards) रविवारी (१५ मार्च) नवी दिल्लीत पार पडला. या सोहळ्यात भारताचे सिनियर-ज्युनियरमधील असे अनेक खेळाडू उपस्थित होते.
या सोहळ्यात १९ वर्षांखालील विश्वविजेते मुला-मुलींच्या संघाचा, २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२६ टी२० वर्ल्ड कप विजेते भारतीय पुरुष संघ, २०२५ महिला वनडे वर्ल्ड कप विजेत्या संघांचा गौरव करण्यात आला. त्यामुळे या सर्व संघातील अनेक खेळाडू सोहळ्यासाठी उपस्थित होते.
मात्र यादरम्यान एका खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधले, तो खेळाडू म्हणजे २४ वर्षीय हर्षित राणा (Harshit Rana). मात्र त्याची अवस्था पाहून कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचीही चिंता वाढली आहे.