SRH's Heinrich Klaasen retires at 33 from international cricket
esakal
Cricket
SRH च्या ३३ वर्षीय स्टार फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; कुटुंबीयांसाठी घेतला हा निर्णय...
SRH's Heinrich Klaasen retires at 33 from international cricket दक्षिण आफ्रिकेचा आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघातील तडाखेबाज फलंदाज हेनरिच क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी हा निर्णय घेतल्यामुळे क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला आहे.
Heinrich Klaasen Retires from International Cricket at 33 : दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हेनरिच क्लासेन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. क्लासेनने आफ्रिकेसाठी ४ कसोटी, ६० वन डे व ५८ ट्वेंटी-२० सामन्यांत प्रतिनिधित्व करताना जवळपास ३३०० धावा केल्या आहेत आणि वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ४ शतकं आहेत. त्याने कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी निवृत्ती जाहीर केली आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या वन डे क्रिकेटमधून निवृत्तीनंतर आजच्या दिवसात निवृत्ती जाहीर करणारा हा दुसरा फलंदाज ठरला. आयपीएल २०२५ मध्ये तो सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळतो.