How much money did South Africa earn after winning WTC Final 2025?
टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५ स्पर्धा जिंकून इतिहास रचला. गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजयाची नोंद करताना आफ्रिकेने २७ वर्षांचा आयसीसी स्पर्धा विजेतेपदाचा दुष्काळही संपवला. दक्षिण आफ्रिकेने १९९८ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावून पहिले आयसीसी स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर बरेच वर्ष प्रयत्न करूनही ऐन मोक्याच्या क्षणाला त्यांनी कच खाल्ली आणि त्यामुळेच ते चोकर्स म्हणून ओळखले गेले. पण, २७ वर्षानंतर त्यांना आयसीसी स्पर्धा जिंकला आली आहे.