
आशिया चषक २०२५ ची सुरुवात ९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये होत असून भारताचा पहिला सामना १० तारखेला आहे.
भारत-पाकिस्तान महामुकाबला १४ सप्टेंबरला खेळला जाणार असून त्यासाठी चाहत्यांची सर्वाधिक उत्सुकता आहे.
ACC ने स्पर्धेच्या तिकिटांसाठी तीन पॅकेजेस जाहीर केली आहे.
How to buy Asia Cup 2025 India vs Pakistan tickets online : आशिया चषक २०२५ स्पर्धा पाच दिवसांवर आली आहे आणि भारताचा पहिला सामना १० सप्टेंबरला संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध होणार आहे. ९ तारखेपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या तिकीट विक्रिला सुरुवात झाली आहे आणि सर्वांना उत्सुकता आहे ती, १४ सप्टेंबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीची. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच भारत-पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांना भिडणार आहे. भारताने शेजाऱ्यांविरद्ध खेळू नये आणि IND vs PAK लढतीवर बहिष्कार टाकावा अशी मागणी करणाराही गट आहे. पण, हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहते आतूर आहेत आणि हे सत्य नाकारता येणारे नाही.