Ishan Kishan Abhishek Sharma viral video after T20 World Cup win
esakal
Ishan Kishan hilarious banter with Abhishek Sharma video: अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांच्यासाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतचा आणि स्पर्धेतील प्रवास हा संघर्षात्मक आणि टीका झेलणारा ठरला. पण, या दोघांनी अंतिम सामन्यात वैयक्तिक अर्धशतक झळकावून भारताच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली. भारताच्या २५५ धावांचा पाठलाग करणारा न्यूझीलंडचा संघ १५९ धावांवर गडगडला आणि सूर्यकुमार यादवच्या संघाने जेतेपद कायम राखण्याचा विश्वविक्रम केला. वर्ल्ड कप संघाच्या स्पर्धेत नसताना इशानची एन्ट्री झाली आणि तो स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा ( ३१७) करणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याने तीन अर्धशतकं झळकावली. तेच दुसरीकडे अभिषेकचा या स्पर्धेतील प्रवास हा आव्हानात्मक होता.