

Vaibhav Suryavanshi
esakal
Vaibhav Sooryavanshi India T20 debut chances : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये आपल्या धमाकेदार फटकेबाजीने चर्चेत राहिलेला वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Sooryavanshi) लवकरच भारताच्या सीनियर ट्वेंटी-२० संघात दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. तो IPL 2026 च्या चालू हंगामातही आपल्या बॅटने धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे १५ वर्षीय खेळाडूच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाबद्दलच्या चर्चांना जोर चढला आहे. वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज आणि समालोचक इयान बिशप यांच्या मते, सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी सज्ज आहे.