

Bangladesh Cricket Team
Sakal
ICC Ultimatum for Bangladesh over T20 WC Travel Controversy: भारत आणि श्रीलंका देशात होणाऱ्या टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी आता साधारण तीन आठवड्यांचाच कालावधी राहिला आहे. पण त्याआधी काही समस्या उभ्या राहिल्या आहेत. बांगलादेशने ही स्पर्धा भारतात खेळायला येण्यास नकार दिला आहे.
त्यामुळे त्याबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्डाची (BCB) जय शाह यांच्यात अध्यक्ष्यतेखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी (ICC) चर्चा सुरू आहे.
याबाबत बुधवारी (२१ जानेवारी) बीसीबी आणि आयसीसी यांच्यात पुन्हा चर्चा झाली आहे. यावेळी आयसीसीने बीसीबीला एका दिवसाचा कालावधी पुन्हा विचार करण्यासाठी दिला आहे, अन्यथा त्यांच्याजागी टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी (T20 World Cup 2026) दुसऱ्या संघाला संधी दिली जाईल.