

Tilak Varma
Sakal
Tilak Varma Injury Updates : टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारी सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी २१ ते ३१ जानेवारी दरम्यान भारत आणि न्यूझीलंड संघात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. पण ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा बसला होता.
भारताचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज तिलक वर्मा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या तीन टी२० सामन्यांना मुकावे लागणार आहे. पण आता त्याच्या दुखापतीवर महत्त्वाच्या अपडेट्स आले आहेत.