
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा सुरु होण्याच्या आधीपासूनच वादात अडकली आहे. बरेच दिवस स्पर्धेच्या आयोजनावरून वाद झाला. या स्पर्धेचे मुख्य आयोजक पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आहे. मात्र, या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास भारताने नकार दिला.
त्यामुळे अनेक चर्चांनंतर अखेर हायब्रिड मॉडेलचा तोडगा निघाला. त्यामुळे आता या स्पर्धेत भारत सहभागी असलेले सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होतील. तसेच इतर सहभागी सातही देश त्यांचे सामने पाकिस्तानमधील लाहोर, कराची आणि रावळपिंडी या तीन ठिकाणी खेळणार आहे.
तसेच जर भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचला, तर उपांत्य फेरीतील भारताचा सामनाही दुबईला होईल, तर अंतिम सामन्यातही भारत पोहचला, तरी तो सामना दुबईलाच होईल.