

ICC Facilitates Visas for Players of Pakistan Origin
Sakal
ICC Facilitates Visas for Players of Pakistan Origin: भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत २० संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेची उत्सुकता मोठ्या प्रमाणात चाहत्यांमध्ये आहे.
तथापि, पाकिस्तानचा संघ त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे, ते भारतात येणार नाहीत. तसेच बांगलादेशचा संघही भारतात खेळण्यावर सध्यातरी प्रश्नचिन्ह आहे. बाकी संघ भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशात खेळताना दिसतील.