
No Rohit Sharma, Virat Kohli in ICC Test Team of the year 2024: आयसीसीने जाहीर केलेल्या २०२४च्या सर्वोत्तम कसोटी संघात भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्मा व विराट कोहली यांना स्थान मिळालेलं नाही. रोहित व विराट यांच्यासाठी २०२४ हे वर्ष काही खास राहिलेले नाही. या दोघांच्या कसोटीतील धावांचा ओघ आटलेला राहिला आणि त्यामुळे त्यांची सर्वोत्तम कसोटी संघात निवड न होणे, निश्चित समजले जात होते. पण, भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) याने या संघात सलामीवीर म्हणून स्थान पटकावले आहे. त्याच्यासोबत भारताच्या दोन खेळाडूंचाही या संघात समावेश केला गेला आहे.