

India vs South Africa 1st Test | WTC 2025-27
Sakal
World Test Championship 2027 qualification scenario : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२७ च्या पर्वात चुरस निर्माण झालेली पाहायला मिळतेय. गतविजेत्या दक्षिण आफ्रिकेने भारतात येऊन कसोटी मालिकेत २-० असा विजय मिळवताना समीकरणात रंगत तयार केली आहे. त्यात न्यूझीलंडने घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजला हरवून दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या दिशेने कूच केली आहे. या पर्वात ऑस्ट्रेलियाने अपराजित मालिका कायम राखून अव्वल स्थान निश्चित केले आहे. या सर्वात टीम इंडिया कुठेय आणि अंतिम फेरीत पोहोचण्याचे त्यांना किती चान्स आहे, याची आकडेमोड सुरू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) गणित मांडून चाहत्यांचा गुंता सोडवला आहे.