

Varun Chakravarthy | ICC T20 Rankings
Sakal
भारतीय टी२० संघाने रविवारी (८ मार्च) अहमदाबादमध्ये न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभूत करत तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कप उंचावला. अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली.
त्यामुळे अभिषेक शर्मा, इशान किशन आणि संजू सॅमसन यांना टी२० क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. मात्र या स्पर्धेत फारसा प्रभावी न ठरलेल्या वरुण चक्रवर्तीला मात्र आपला अव्वल क्रमांक गमवावा लागला आहे. आयसीसीने बुधवारी ताजी टी२० क्रमवारी जाहीर केली आहे.