ICC Test Rankings: बुमराह खेळत नसूनही अव्वल, तर ट्रॅव्हिस हेडनं गमावलं पहिल्या क्रमांकाचं सिंहासन! आता कोण झालं 'नंबर वन'?

ICC Men's Test Rankings 2026 Update: भारताने श्रीलंकेला पहिल्या कसोटीत पराभूत केलं, तर बांगलादेशनेही ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची किमया साधली. यानंतर आयसीसी नुकतीच कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे.
Jasprit Bumrah | Travis Head | ICC Test Ranking

Jasprit Bumrah | Travis Head | ICC Test Ranking

Sakal

Updated on

ICC Men's Test Rankings 2026 Update: भारतीय संघाने नुकतेच बुधवारी श्रीलंका क्रिकेट संघाला कसोटी मालिकेतील गॉलला झालेल्या पहिल्या कसोटीत पराभवाचा धक्का दिला. या विजयामुळे भारतीय संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

याशिवाय दोन दिवसांपूर्वी बांगलादेश क्रिकेट संघानेही ऑस्ट्रेलियाला डार्विल कसोटीत पराभूत करत मोठा उलटफेर केला होता. या सामन्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे.

Jasprit Bumrah | Travis Head | ICC Test Ranking
ICC ODI Ranking: भारताचा दबदबा! गिल, रोहित, विराट टॉप-४ मध्ये; पहिल्या क्रमांकासाठी काट्याची टक्कर
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com