
जवळपास १५० वर्षांचा इतिहास असलेल्या क्रिकेट खेळात अनेक बदल इतक्या वर्षात झाले आहेत. सुरुवातीला एकच प्रकार असलेल्या या खेळाचे आता वेगवेगळ्या प्रकार आहेत. बरेच नियम वेळेनुसार बदलण्यातही आले. अनेक नवे प्रयोगही झाले आहेत.
आता पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये नवीन प्रयोग होताना दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही नियमांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) मोठे बदल करणार आहे. वनडेमधील चेंडू, कन्कशन सब्सिट्यूट, डीआरएस अशा बाबतीतील नियमांबाबत आयसीसीने मोठे निर्णय घेतले आहेत. आयसीसी जूनपासून हे नवे नियम लागू करणार आहेत.