PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

PCB T20 WC 2024
PCB T20 WC 2024ESAKAL

PCB T20 WC 2024 : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपला संघ आगामी टी 20 वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करावा म्हणून चांगलीच मेहनत घेत आहे. पाकिस्तानी संघाचा फिटनेस सुधारण्यासाठी त्यांना आर्मीच्या कॅम्पमध्ये ट्रेनिंग देखील देण्यात आलं. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पाकिस्तानी खेळाडूंनी कोट्यावधी रूपयांचे बक्षीस देखील जाहीर केलं आहे. जर पाकिस्तान संघ आगामी टी 20 वर्ल्डकप जिंकला तर त्यांना 2.77 कोटी पाकिस्तानी रूपये मिळणार आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अजून टी 20 वर्ल्डकपसाठीचा आपला संघ जाहीर केलेला नाही. मात्र न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत खेळलेल्या संघात फार बदल होतील अशी अपेक्षा नाही.

PCB T20 WC 2024
IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

पीसीबीचं 2 कोटींचे मोटिवेशन

पीसीबी चेअरमन मोहसीन नक्वी यांनी पाकिस्तान संघाला भेट दिली. पाकिस्तान संघ सध्या लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये कॅम्प करत आहे. पीसीबीने माध्यमांना एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत नक्वी हे खेळाडूंशी बोलताना दिसत आहेत. त्यांनी नसीम शाहला टी 20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेतल्याबद्दल आणि मोहम्मद रिझवानला टी 20 क्रिकेटमध्ये 3000 धावा पूर्ण केल्याबद्दल देखील बक्षीस दिलं. त्यांनी खास जर्सी या खेळाडूंना दिली.

नक्वी यांनी खेळाडूंशी दोन तास चर्चा केली आणि त्यांचे मनोबल वाढवलं. त्यांनी खेळाडूंना दबावाशिवाय खेळण्याचा सल्ला दिला. नक्वी म्हणाले की, 'कोणाची चिंता करू नका. फक्त पाकिस्तानसाठी खेळा. मैदानावर सांघिक खेळ दाखवा. देवाच्या कृपेने तुमचा विजय होईल. देशाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्या तुम्ही पूर्ण कराल.'

PCB T20 WC 2024
T20 World Cupपूर्वी प्रमुख गोलंदाज झाला जखमी, दुखापतीमुळे संपूर्ण IPL हंगामातून बाहेर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com