IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

IND A VS AUS A 3RD ODI: भारत अ संघाने तिसऱ्या वनडेत ४७ षटकांत २७५ धावा केल्या. सूर्यांश शेडगे आणि खालच्या फळीच्या योगदानामुळे ऑस्ट्रेलिया अ समोर २७६ धावांचं लक्ष्य आहे.
IND A vs AUS A

IND A vs AUS A

esakal

Updated on: 

IND A VS AUS A 3RD ODI: भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघांमध्ये आज (११ ऑक्टोबर) तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना खेळवला जात आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून ऑस्ट्रेलिया अ संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे शेवटचा सामना जिंकून व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान भारतीय संघासमोर आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारत अ संघाने ४७ षटकांत २७५ धावा केल्या. आता हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलिया अ संघाला २७६ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com