

IND A vs SL A, Test
esakal
India A vs Sri Lanka A Test: भारत अ विरुद्ध श्रीलंका अ(India A vs Sri Lanka) संघात गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या अनऑफिशियल कसोटी सामन्यात भारतीय संघाने तिसऱ्या दिवशीही आपले वर्चस्व कायम राखले आहे.
पहिल्या डावात ४५२ धावांचा डोंगर उभारल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंका अ संघाने ९ बाद ३३० धावा केल्या आणी अजूनही ते भारतापेक्षा १२२ धावांनी पिछाडीवर आहेत.