India win T20 World Cup 2026 vs New Zealand final
esakal
India Lift Third T20 World Cup Title : महेंद्रसिंग धोनी व रोहित शर्मा यांच्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले... रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या २०२४ च्या वर्ल्ड कपमुळे गतविजेता म्हणून भारत यंदा मैदानावर उतरला होता. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचे जेतेपद कायम राखणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला. शिवाय ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वाधिक ३ जेतेपदं ( २००७, २०२४ व २०२६) भारताच्या नावावर झाली आहेत. यजमान म्हणूनही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणारा हा पहिला संघ ठरला. भारताच्या या विजयी प्रवासात संजू सॅमसन ( Sanju Samson) याचा सिंहाचा वाटा ठरला. आज भारतीय संघाने सर्व आघाड्यांवर उल्लेखनीय कामगिरी केली.