India U19 players
esakal
India U-19 Vs Sri Lanka U-19 Asia Cup Semifinal Marathi News: १९ वर्षांखालील मुलांसाठीच्या आशिया चषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा भारत-श्रीलंका सामना पावसाच्या व्यत्ययामुळे २०-२० षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. दुसरीकडे बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान लढतही २७-२७ षटकांची होत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी चांगला मारा करून अंतिम फेरीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. श्रीलंका व बांगलादेश यांनी ठेवलेले लक्ष्य पाहता भारत व पाकिस्तान हे अंतिम फेरीत प्रवेश करतील असेच दिसतेय. त्यामुळे चाहत्यांना India vs Pakistan सामना पाहायला मिळू शकतो.