IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

India vs Afghanistan 2nd T20I : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला या सामन्यातही संधी मिळालेली नाही.
India vs Afghanistan

India vs Afghanistan second T20I playing eleven

esakal

Updated on

Afghanistan vs India 2nd T20I Marathi Update: पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ मालिका खिशात घालण्यासाठी मैदानावर उतरली आहे. संजू सॅमसन अपयशी ठरल्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या T20 त वैभव सूर्यवंशीला संधी मिळतेय का, याची उत्सुकता होती. श्रेयस अय्यरने पुन्हा टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. वरुण चक्रवर्थीला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने त्याच्या जागी कोण येईल, याचीही उत्सुकता होतीच.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com