IND vs AFG, Viral Video: कर्णधार श्रेयस अय्यरने मालिका जिंकलीच, पण मनंही जिंकली; अफगाणिस्तानच्या कर्णधाराला बोलावलं अन्...

Shreyas Iyer Invites Ibrahim Zadran to Jointly Lift Friendship Cup Trophy : भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध टी२० मालिका जिंकल्यानंतर श्रेयस अय्यरने त्याच्या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत. त्याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
Afghanistan vs India T20I

Shreyas Iyer Invites Ibrahim Zadran to Jointly Lift Friendship Cup Trophy

Sakal

Updated on

Afghanistan vs India, T20I: भारतीय टी२० संघाने कर्णधार श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वात अफगाणिस्तानविरुद्ध नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेली तीन सामन्यांची टी२० मालिका सहज जिंकली. गुरुवारी (१७ सप्टेंबर) या मालिकेतील तिसरा सामना पार पडला, जो भारताने तब्बल १२७ धावांनी जिंकला.

भारताचा हा अफगाणिस्तानवरील टी२० मधील सर्वात मोठा विजय होता. पण ही मालिका जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीने सर्वांचीच मनं जिंकली.

Afghanistan vs India T20I
IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com