
Irfan Pathan, Sanjay Manjrekar collide on live TV: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. विराट कोहली व यशस्वी जैस्वाल यांच्या भागीदारीने भारतीय संघाला धीर दिला होता. पण, यशस्वी रन आऊट झाला आणि विराट पुढच्या षटकात माघारी परतला अन् ऑस्ट्रेलियाने पुन्हा सामन्यावर पकड घेतली.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४७४ धावांच्या प्रत्यु्त्तरात भारताने ५ बाद १६४ धावा केल्या आहेत. यशस्वीचा रन आऊट हा आजच्या दिवसाचा वादाचा विषय बनत चालला आहे. यावरून इरफान पठाण व संजय मांजरेकर या माजी खेळाडू ऑन एअर भिडले.