Vaibhav Sooryavanshi is in contention for his maiden India
Will Vaibhav Sooryavanshi make his India debut vs England? आयर्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर भारतीय संघात आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत बदल पाहायला मिळणे अपेक्षित आहे. १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला आयर्लंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल, अशी हवा तयार केली गेली होती. पण, दोन्ही सामन्यात नवीन कर्णधार श्रेयस अय्यर आपल्या अनुभवी खेळाडूंवर कायम राहिला. मात्र, आघाडीच्या सर्व अनुभवी फलंदाजांना आलेल्या अपयशामुळे भारताला मालिका गमवावी लागली. त्यामुळे आता तरी वैभवला पदार्पणाची संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व कर्णधार अय्यर १ जुलैपासून सुरू होणाऱ्या ENG vs IND मालिकेत वैभवला संधी देण्याची शक्यता आहे.