Ind vs Eng : तिसऱ्या कसोटीत पडणार विक्रमांचा पाऊस! अश्विन 500 तर अँडरसन 700 खेळाडूंची करणार शिकार; स्टोक्सही नाही मागे

Ind Vs Eng 3rd Test Records : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून (१५ फेब्रुवारी) राजकोटमध्ये सुरू होणार आहे.
Ind Vs Eng 3rd Test Records Marathi News
Ind Vs Eng 3rd Test Records Marathi Newssaka;

Ind Vs Eng 3rd Test Records : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून (१५ फेब्रुवारी) राजकोटमध्ये सुरू होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांचे खेळाडू मोठे विक्रम आपल्या नावावर करू शकतात. भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन 500 विकेट्सपासून फक्त एक पाऊल दूर आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा महान गोलंदाज जेम्स अँडरसन 700 बळी घेणारा तिसरा गोलंदाज बनू शकतो. याशिवाय स्टोक्स कारकिर्दीतील 100 वा सामना खेळणार आहे.

Ind Vs Eng 3rd Test Records Marathi News
यंदा IPL 2024 थरार रंगणार भारताबाहेर? अध्यक्षांनी दिली मोठी अपडेट

अँडरसनही विक्रमाच्या उंबरठ्यावर

दुसरीकडे इंग्लंडचा सर्वात अनुभवी खेळाडू जिमी अँडरसन ७०० कसोटी बळींपासून फक्त ५ विकेटस् लांब आहे. वयाची चाळिशी पार करूनही अँडरसन अजूनही जोमाने कसोटी क्रिकेट खेळतो आहे आणि परिणाम साधणारा मारा करून दाखवतो आहे.

अश्विनलाही विक्रमाची संधी

भारताचा रवीचंद्रन अश्विन ५०० कसोटी बळींच्या अगदी उंबरठ्यात उभा आहे. ४९९ बळी घेतलेल्या अश्विनला ५००वी विकेट राजकोटला मिळणार, अशी ग्वाही त्याचा फिरकीचा साथीदार जडेजाने दिली आहे.

Ind Vs Eng 3rd Test Records Marathi News
Ind vs Eng : राजकोटमध्ये कोण करणार ‘राज’! भारत-इंग्लंड यांच्यात तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार आजपासून; कोणाला मिळणार संधी?

बेन स्टोक्सची १०० वी कसोटी

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्साठी भारत दौरा कधी कटू तर आता गोड आठवणींचा ठरणार आहे. कधी निराशा तर आता १०० वा कसोटी सामना असा प्रवास त्याने केला आहे.

कारकिर्दीच्या सुरुवातीला खराब वर्तनामुळे तत्कालीन इंग्लंड संघाचे प्रशिक्षक अँण्डी फ्लॉवर यांनी बेन स्टोक्सला भर दौरा चालू असताना घरी पाठवले होते. भारतात झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेन स्टोक्सला शेवटच्या षटकात चार षटकार मारून विंडीज संघाने कप जिंकला होता.

त्या अपयशाला पचवून कष्ट करणाऱ्‍या बेन स्टोक्सने २०१९ सालचा वर्ल्डकप इंग्लंडला जिंकून देताना भन्नाट खेळी अंतिम सामन्यात केली होती. बेन स्टोक्स बऱ्‍याच दुखापती तसेच मानसिक त्रासाचे आजार पेलून १०० वा कसोटी सामना खेळणार असल्याने त्याचे मोल वाढले आहे. त्यातून त्याने इंग्लंड संघाला वेगळ्या विचारांनी खेळायला लावून लक्षणीय बदल घडवले असल्याने इंग्लंड संघातील खेळाडूंच्या मनात त्याच्याबद्दल असलेला आदर स्पष्ट दिसतो आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com