Vaibhav Sooryavanshi wicket vs England 4th T20I
esakal
England vs India, 4th T20I Marathi Cricket Update : एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार अन् अपर कटने थर्ड मॅनवर षटकार मारल्यानंतर वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Sooryavanshi) आज मोठी खेळी करेल असे वाटले होते. पण, आयपीएल समजून दाखवलेला उतावळेपणा त्याला पुन्हा एकदा महागात पडला. जोफ्रा आर्चरला ( Jofra Archer) युवा फलंदाजाला बाद करण्याची युक्ती सापडली आहे आणि त्याने पुन्हा एकदा सापळा रचून त्याला माघारी पाठवले. १४, १३ धावांनंतर वैभव १५ धावांवर आज माघारी परतला.