Akash Deep Debut : क्रिकेटच्या मैदानात भावुक क्षण! कसोटी कॅप मिळताच आकाश दीप आईच्या पायात नतमस्तक

रांची येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे
Akash Deep Debut marathi news
Akash Deep Debut marathi newssakal

Akash Deep Debut : रांची येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारताकडून एक मोठा बदल करण्यात आला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला चौथ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे.

Akash Deep Debut marathi news
Ind vs ENG 4th Test : पहिला डाव भुताचा! पदार्पण सामन्यात आकाश दीपने साहेबांना आणलं रडकुंडी

भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. रांची येथे प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याला कसोटी कॅप दिली. आकाश दीप भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा 313 वा खेळाडू ठरला आहे.

रांचीच्या स्टेडियममध्ये जेव्हा ही टेस्ट कॅप आकाश दीपला देण्यात आली. तेव्हा आकाश मैदानाबाहेर उभ्या असलेल्या त्याच्या आईकडे गेला. त्याने चरण स्पर्श करत आईचा आशीर्वाद घेतला. यावेळी तेथे उपस्थित त्यांचे कुटुंबीय खूपच भावूक झाले.

Akash Deep Debut marathi news
Ind vs Eng : इंग्लंडचा स्टार खेळाडू अचानक भारत गेला सोडून...! संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर, जाणून घ्या कारण

यावेळी आकाशच्या आईसह त्याचा भाऊ आणि नातेवाईकही तेथे उपस्थित होते. त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच आकाश दीपने इंग्लंडविरुद्ध गोलंदाजी केली. त्याने भारताला धमाकेदार सुरुवात करून दिली. आकाश दीपला तीन विकेट घेण्यात यश आले. त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यातच आकाश दीप आपल्या गोलंदाजीचे पराक्रम सिद्ध करत आहे.

2020 मध्ये आयपीएल लिलावादरम्यान आकाशदीपला रॉयल चॅलेंज बंगळुरू संघाने 20 लाख रुपयांना खरेदी केले होते. आकाश दीपच्या नावावर 28 लिस्ट ए सामन्यात 42 विकेट्स आहेत. आकाशच्या नावावर 30 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 104 विकेट्स आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com