IND vs ENG 5th Test: मोहम्मद सिराज मॅजिक! Joe Root ची सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी अन् मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

India vs England 5th Test Marathi Cricket News : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात जो रूटने सर डॉन ब्रॅडमन यांचा कसोटीतील मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली. तसेच, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.
India vs England 5th Test Marathi News
India vs England 5th Test Marathi Newsesakal
Updated on

England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: इंग्लंडने पाचव्या कसोटीत पहिल्या डावात आघाडी घेण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. बेन डकेट व झॅक क्रॉली यांच्या दमदार सुरुवातीनंतर जो रूटने ( Joe Root) चांगला खेळ करत संघाला दोनशेपार पोहोचवले. भारताच्या पहिल्या डावातील २२४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडे ४० षटकांत ५ बाद २०५ धावा केल्या आहेत. मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj ) परतीच्या स्पेलमध्ये तीन विकेट्स घेताना इंग्लंडला मोठे धक्के दिले. यामध्ये रूटसह कर्णधार ऑली पोप व जेकब बेथेल यांचा समावेश आहे. रूट माघारी परतला असला तरी त्याने सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली, तर सचिन तेंडुलकरला दुसऱ्या विक्रमात मागे टाकले.

गोलंदाजांनंतर इंग्लंडच्या फलंदाजांनीही दमदार कामगिरी केलेली पाहायला मिळतेय. गस अॅटकिन्सच्या पाच विकेट्समुळे भारताचा पहिला डाव २२४ धावांवर गडगडला. भारताकडून करूण नायर ( ५७), साई सुदर्शन ( ३८) व व़ॉशिंग्टन सुंदर ( २६) यांनी चांगला खेळ केला. सलामीवीर बेन डकेट व झॅक क्रॉली यांनी १२.५ षटकांत ९२ धावा जोडून भारतीय गोलंदाजांची लय बिघडवली. आकाश दीपने भारताचे खाते उघडताना डकेटला ( ४३) बाद केले. लंच ब्रेकनंतर प्रसिद्ध कृष्णाने इंग्लंडचा दुसरा सलामीवीर क्रॉलीला बाद केले. त्याने ५७ चेंडूंत १४ चौकारांच्या मदतीने ६४ धावांची खेळी केली.

मोहम्मद सिराजने पुनरागमनाच्या स्पेलमध्ये कर्णधार ऑली पोपचा ( २२) अडथळा दूर केला. इंग्लंडने १४२ धावांत तीन फलंदाज गमावल्यानंतर मैदानावर आलेल्या जो रूटला भारतीय गोलंदाजांकडून मुद्दाम डिवचण्याचा खेळ सुरू केला. हॅरी ब्रूकला आक्रमक खेळ करण्यापासून रोखण्यासाठी यष्टीरक्षक ध्रुव जुरेल यष्टींजवळ येऊन उभा राहिला. त्यामुळे ब्रूक कोषात गेला आणि त्याला सावध खेळ करावा लागला.

India vs England 5th Test Marathi News
IND vs ENG 5th Test: शांत स्वभावाच्या Joe Root चा पारा चढला, प्रसिद्ध कृष्णा असं नेमकं त्याला काय म्हणाला? अम्पायरची मध्यस्थी

मोहम्मद सिराजही ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील २०० वी विकेट्स ठरली. त्याने सर्वाधिक १०६ विकेट्स या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना घेतल्या आहेत. सिराजने पुन्हा अप्रतिम चेंडू टाकून भारताला मोठे यश मिळवून दिले. त्याने टाकलेला चेंडू पुन्हा खाली राहिला अन् रूटच्या पॅडवर आदळला. इंग्लंडच्या फलंदाजाने DRS घेतला, परंतु त्याचा फायदा नाही झाला. तो ४५ चेंडूंत ६ चौकारांसह २९ धावांवर LBW झाला.

घरच्या मैदानावर कसोटीत सर्वाधिक धावा

  • ७५७८ - रिकी पाँटिंग ( १५४ डाव)

  • ७२२४ - जो रूट ( १४६ डाव)

  • ७२१६ - सचिन तेंडुलकर ( १५३ डाव)

  • ७१६७ - माहेला जयवर्धने ( १२९ डाव)

  • ७०३५ - जॅक कॅलिस ( १४३ डाव)

India vs England 5th Test Marathi News
IND vs ENG 5th Test: मी तर त्याला मारला असता! बेन डकेटला बाद करून आकाश दीपने डिवचले, इंग्लंडचे प्रशिक्षक संतापले; अम्पायर...

घरच्या मैदानावर एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध कसोटीत २०००+ धावा करणारा जो रूट हा सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर दुसरा फलंदाज ठरला. ब्रॅडमन यांनी ऑस्ट्रेलियात इंग्लंडविरुद्ध २३५४ धावा केल्या होत्या आणि त्यानंतर जो रूटने आज भारताविरुद्ध इंग्लंडमध्ये २००६ धावांचा टप्पा गाठला. असा पराक्रम कसोटीत या दोनच फलंदाजांनी केला आहे.

भारताविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा

  • ४७९५ - रिकी पाँटिंग ( १११ डाव)

  • ४५६३ - माहेला जयवर्धने ( ११७ डाव)

  • ४२९० - जो रूट ( ९३ डाव)

  • ४२८७ - कुमार संगकारा ( १०३ डाव)

  • ३९८६ - स्टीव्ह स्मिथ ( ८३ डाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com