
इंग्लंड विरुद्ध भारत संघात हेडिंग्लेमध्ये सुरू असलेला पहिला कसोटी सामना रोमांचक वळणावर असून पाचवा आणि अंतिम दिवस निर्णायक आहे. दोन्ही संघांकडून आत्तापर्यंत फलंदाजीत चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे.
मात्र, इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुटला मात्र पहिल्या डावात चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करता आली नव्हती. पण त्याने क्षेत्ररक्षणात मोठा विश्वविक्रम केला आहे. याशिवाय भारताचा दिग्गज राहुल द्रविडची बरोबरी केली आहे.