

IND vs IRE 1st T20I
esakal
IND vs IRE 1st T20I: भारत आणि आयर्लंड(IND vs IRE) यांच्यात आजपासून म्हणजेच २६ जूनपासून टी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेत २ टी-२० सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यात सगळ्यांचे लक्ष १५ वर्षीय युवा वैभव सूर्यवंशीकडे असणार आहे.
या मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरवर(Shreya sIyer) सोपवण्यात आली आहे, तर उपकर्णधार म्हणून युवा तिलक वर्मावर विश्वास दाखवण्यात आला आहे.