IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Ishan Kishan inside edge controversy IND vs NAM: भारत विरुद्ध नामिबिया वर्ल्ड कप सामन्यात इशान किशनच्या विकेटवरून मोठा वाद निर्माण झाला. नामिबियाच्या गोलंदाजाच्या चेंडूवर जोरदार अपील करण्यात आले, मात्र मैदानी पंचांनी तो चेंडू बॅटला लागल्याचे (इनसाईड एज) सांगत इशानला नॉट आऊट दिले. त्यावरून वाद पेटला आहे.
Ishan Kishan inside edge controversy IND vs NAM

Ishan Kishan inside edge controversy IND vs NAM

esakal

Updated on

IND vs NAM umpiring controversy explained: भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नामिबियाविरुद्ध विजयाच्या दिशेने कूच केली आहे. या सामन्यात इशान किशन ( Ishan Kishan) आणि हार्दिक पांड्या यांनी अर्धशतकी खेळी केली. ७ षटकांत १०४ धावा उभ्या करणाऱ्या भारताला नामिबियाच्या गोलंदाजांनी २०९ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. या सामन्यात इशानच्या आक्रमक फटकेबाजीने सर्वांचे मन जिंकले, परंतु त्याच्यावर अम्पायरची कृपादृष्टी पडल्याची चर्चा रंगू लागली आहे. पाकिस्तानाच्या चाहत्यांकडून हा आरोप होताना दिसतोय आणि त्यांनी थेट BCCI, ICC ला यांच्यावर फिक्सर असल्याचा आरोप केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com