Warning Signs for Team India Before Pakistan Match
esakal
India vs Namibia T20 World Cup Marathi Cricket News : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नामिबियासमोर विजयासाठी २१० धावांचे लक्ष्य ठेवले. इशान किशन व हार्दिक पांड्या यांच्या अर्धशतकांनी ही मॅच गाजवली. पण, ७ षटकांत १०४ धावांपर्यंत गेलेल्या भारताला शेवटच्या १३ षटकांत फक्त १०५ धावा करता आल्या. शेवटच्या दोन षटकांत भारताने १० धावांत ५ विकेट्स गमावले आणि India vs Pakistan सामन्यापूर्वी ही खूप मोठी चिंताजनक गोष्ट आहे. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात जे घडले, त्यापेक्षा भयंकर अन् चिंता वाढवणारी गोष्ट नामिबियाविरुद्ध घडली. ही मॅच पाकिस्तानचा संघ पाहत असेल तर त्यांना भारताविरुद्ध जिंकण्याची स्ट्रॅटर्जी समजली असेल. समालोचन करणाऱ्या आकाश चोप्रा, नवज्योत सिंग सिद्धू यांनीही ही चिंता आज व्यक्त केली आहे.