

Henry Nicholls and Glenn Phillips | India vs New Zealand 1st Test
Sakal
New Zealand vs India 1st Test: गुरुवारपासून (१९ नोव्हेंबर) भारत आणि न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे सुरू झाला आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुरवातीला न्यूझीलंडला मोठे धक्के देत पहिल्या सत्रात वर्चस्व मिळवले होते.
परंतु, दुसऱ्या सत्रात हेन्री निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स (Henry Nicholls and Glenn Phillips) यांच्या भागीदारीने न्यूझीलंडचा डाव सावरला असल्याने दुसरे सत्र न्यूझीलंडच्या नावावर राहिले.